Salute to Anil Pandey who has been practicing continuously for 12 years to take a high leap in the sport of rifle shooting!

शैक्षणिक योग्यतेसोबत आजच्या जगात स्पर्धेत उतरण्यासाठी अनेक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणे फारच आवश्यक आहे. असेच एक महत्वपूर्ण क्षेत्र म्हणजे 'क्रीडा'. अशाच क्रीडा क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून अविरत प्रशिक्षणाचे कार्य करणाऱ्या नागपुरातील अनिल पांडे यांच्या विषयी जरा जाणून घेऊया.

    १) तुमच्या आणि तुमच्या शूटिंग रेंजच्या यशाबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल, त्याबद्दल आपण जरा माहिती सांगावी ?  

    आमच्या अकादमी ऑरेंज शूटिंग स्पोर्ट्स शुटिंग रेंज याच्या दोन शाखा नागपुरात आहेत. १) स्वावलंबी नगरला आहे. २) अजनी येथे स्थित आहे.
    २०११ मध्ये मी शूटिंग ची सुरुवात केली होती. तेव्हा नागपुरात शूटिंगचा गंधही नव्हता. त्यांनतर मी खूप प्रयत्नांनी अजनी येथे शूटिंग रेंज सुरु केली. नंतर, मी रॉयल गोंडवाना स्कूल येथे प्रशिक्षक शूटर म्हणून काम करू लागलो. तेव्हा तेथे माझी विध्यार्थी म्हणा की माझी सहकारी म्हणा, निकिता चौधरी हिच्यासोबत मी या खेळाची सुरुवात केली. ती मला प्रशिक्षण द्यायची मी तिला द्यायचो. अशा पद्धतीने या क्षेत्रात उंच भरारी घ्यायच्या स्वप्न स्वप्नांची निर्मिती व्हायला लागली.

    त्यांनतर, ती २०१६-१७ मध्ये तिची जुनियर शूटिंग (squd) पथकामध्ये निवड झाली. आणि तेव्हापासून आमचा या क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला. बऱ्याच शूटर्सची निवड व्हायला लागल्यामुळे मी सुद्धा प्रशिक्षणात लक्ष द्यायला लागलो. आता आमच्याकडील बरेच शूटर्स हे राष्ट्रीय पदक विजेते आहे. तर, बरेच राष्ट्रीय (squd) या पथका मध्ये आहे. तसेच, आर्मीचे शूटर्सचीही आमच्या रेंज तर्फे निवड झालेली आहे. आता सध्या बऱ्याच शूटर्सनी पदकांची कमाई केलेली आहे. यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय, आंतर शालेय तसेच विद्यापीठीय पदकांची समावेश आहे.

    २ ) तुमची रायफल शूटिंग या खेळाशी ओळख कशी झाली ?  
    अभिनव बिंद्रा सरांनी जेव्हा २००८ मध्ये ऑलम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकल, तेव्हा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी या खेळाची सुरुवात केली. या खेळाचं तेव्हा खूप आकर्षण वाटलं त्यामुळे, मला या खेळाविषयी ओढ निर्माण झाली. तेव्हा इथे कुणीच प्रशिक्षक नव्हते, त्यामुळे मी आधी घरीच या खेळाचे स्वतःच प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. यात माझी आई १० मीटरवर टारगेट लावायची. आणि ते परत मला आणून द्यायची.

    ३) या क्षेत्रात खेळतांना तुम्हाला कुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागले ?

    शूटिंग रेंज नसल्यामुळे ती उभारण्यापासून सुरुवात करावी लागली. अशी आम्ही ४ लेन पासून सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडे पुली होत्या. आता आमच्याकडे १८ पुलीवर राष्ट्रीय पातळीवरील शूटर्स प्रॅक्टिस करू शकतील, अशी शूटिंग रेंज उपलब्ध आहे. आता सध्या आंतर राष्ट्रीय पातळीवरच्या सुविधा म्हणजे शूज ॲस स्कॉर सुद्धा उपलब्ध आहे. तसेच, सध्या १७ रायफल फक्त रेंजच्या उपलब्ध आहे.

    ४)पुली म्हणजे नेमकं काय ?

    पुली म्हणजे ज्यावर आपण रायफलने गोळी झाडात असतो. ती गोळी झाडल्यानंतर इलेट्रॉनिक पुली आपल्याला स्क्रीनवर आपले पॉईंट दाखवतात. तर मॅन्युअल पुली आपल्याला कागदाच्या टार्गेटवर आपले पॉईंट दाखवतात.

    ५)अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला या क्षेत्रात अविरत खेळत राहण्यास प्रेरणा देते ?

    प्रत्येक खेळाडूच स्वप्न असतं ऑलम्पिक पदक, माझाही तेच आहे. तेच मला अविरत खेळात राहण्यास प्रेरणा देत. या क्षेत्रात १२ वर्ष सतत खेळात असूनही अजूनही यातील आकर्षण कमी झालेले नाही. १० वर्ष शूटर्सना दिलेल्या प्रशिक्षनाणे माझा तांत्रिक ज्ञान अधिकच पक्का केला आहे.
    ६) सर, असा म्हटल्या जात की हा खेळ खूपच खर्चिक आहे ?  
    हो, हे काही प्रमाणात खरं आहे. परंतु, या विषयाला आपण कस हाताळतो, यावर ती गोष्ट आधारित आहे. उगाच दुसरं कुणाला दोष देण्यापेक्षा आपल्या योग्यता दाखविणे जास्त महत्वाचं ठरत.
    ७)काय आपण याला एखादा छंद म्हणून जोपासू शकतो का ?
    हो, तुम्ही जोपासू शकता. तसेच, या खेळात कुठलीही वयोमर्यादा नसल्यामुळे कुठल्याही वयात तुम्ही सुरुवात करू शकता.

    ८)यात कुठल्या साहित्याचा उपयोग होतो ?
    यात रायफल, शूज, रायफलच्या गोळ्या, स्टॅन्ड,जॅकेट, ट्राउझर,ग्लोव्हज या गोष्टीचा उपयोग होतो.

    ९)या खेळात यश प्राप्त करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते ?
    तुमचा तुमच्या आयुष्यातील फोकस कसा असतो, यावर यातील यश महत्वाचं असतो. स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करण फारच आवश्यक आहे. उगाच दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावला की आपली एकाग्रता भंग होते. आणि आपल्या खेळावर त्याचा परिणाम होतो.