समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस सुरक्षा वाढविली

पोलिसांच्या माहितीनुसार अबू आझमीच्या पीएला धमकीचा फोन आला आहे. औरंगजेबबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत हा फोन केला असून, या फोनवरुन जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं हा फोन केला, याचा पोलीस तपास व शोध घेताहेत.

    मुंबई– समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा सपाचे आमदार अबू असीम आझमी (MLA Abu Azmi) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार आबू आझमी यांनी जीवे मारण्याची धमकी (threatened) देण्याती आली आहे. यामुळं आबू आझमी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात (Coloba police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अबू आझमीच्या पीएला धमकीचा फोन आला आहे. औरंगजेबबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत हा फोन केला असून, या फोनवरुन जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं हा फोन केला, याचा पोलीस तपास व शोध घेताहेत.

    दरम्यान, औरंगजेबचा कथित समर्थन केल्यामुळं आमदार अबू आझमीला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. तक्रार मिळाल्यानंतर मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी भादंवि कलम 506(2) आणि 504 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

    तसेच हा फोन कुठून आला व कोणी केला याचा सध्या पोलीस शोध घेताहेत. तसेच आमदार आबू आझमी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अबू आझमीच्या पीएला धमकीचा फोन आला आहे. औरंगजेबबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत हा फोन केला असून, या फोनवरुन जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं हा फोन केला, याचा पोलीस तपास व शोध घेताहेत.