शिंदे गटातील आमदार, खासदारांच्या ‘सामना’ने जाहिराती नाकारल्या, ‘या’ कारणामुळं जाहिरातीस नकार

शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना (shinde Group Mla and MP) शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये (Samanna) जाहिराती (advertising) द्यायच्या होत्या, पण त्या जाहिराती सामनानं स्विकारण्यास नकार दिला आहे. कारण त्या जाहिरातींमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा शिवसेना पक्षप्रमुख (shivsena chief) नव्हता  असं सांगितलं जात आहे.

    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त (Uddhav Thackeray Birthday) शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना (shinde Group Mla and MP) शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये (Samanna) जाहिराती (advertising) द्यायच्या होत्या, पण त्या जाहिराती सामनानं स्विकारण्यास नकार दिला आहे. कारण त्या जाहिरातींमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा शिवसेना पक्षप्रमुख (shivsena chief) नव्हता  असं सांगितलं जात आहे. या कारणामुळं जाहिराती नाकारल्या गेल्या आहे, त्यामुळं शिंदे गट समर्थक आमदार व खासदार यांच्या जाहिराती ‘सामना’ने नाकारल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, भुवया उंचावल्या आहेत.

    दरम्यान, उद्धव ठाकरे आमचे वरिष्ठ नेते आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेय. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा आम्ही नेहमीच आदर केलाय. बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही पुढे चालणारे आहोत. महाराष्ट्राची परंपरा आहे, त्यानुसार आम्ही आदराने त्यांना नेहमीच शुभेच्छा दिल्या होत्या, पण सामनाने त्या नाकारल्या आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळेंनी (Rahul Shewale) दिली आहे. मात्र या शिंदे गटातील आमदार व खासदारांनी जाहिरातीत कुठेही पक्षप्रमुख असा उल्लेख केला नव्हता. तसेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे, पक्षप्रमुख असं ट्विटमध्ये लिहणं टाळलं आहे. हा सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे.