
व्यासपीठावर माजी मंत्री अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील पंधरा दिवसापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी औषधोपचार व पाणी घेणे सुद्धा बंद केले होते. यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत मराठा आंदोलकांना मार्गदर्शन आज अंतरवाली सराटी येथे आंदोलन स्थळी येऊन केले. यावेळी त्यांनी या मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याचे मत सुद्धा व्यक्त केले आहे व मनोज जरांगे पाटील यांचे जे उपोषण सुरू आहे या आंदोलनाला यश नक्की मिळेल अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
यावेळी आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन तरुणांना दिलेल्या पाठिंबाबद्दल त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले आहे. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहेत. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी तुमचा लढा योग्य आहे. सध्याचे सरकार खोटारडे नाही. एकनाथ शिंदे खोटं बोलणारे नाहीत, देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत, असा शब्द जरांगे पाटील यांनी दिला.