
आज येवलाला आल्यानंतर मी खुश व्हायला पाहिजे परंतु मी व्यथित झालो
संभाजी राजे : स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजी राजे आज येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वराज्य पक्षाच्या शाखा फलक उद्घाटन प्रसंगी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मंत्री छगन भुजबळांचे नाव न घेता स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रश्न केले आहेत. पत्रकार परिषदेमध्ये संभाजी राजे म्हणाले, प्रश्नांची उत्तरे द्यावी तरच विकास झाला असे म्हणेल व येत्या २०२४ ला स्वराज्य येणार अशी प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी पत्रकारांनी विचारलेला प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
संभाजी राजे यांना छगन भुजबळ यांच्या संबंधित प्रश्न विचारला असता संभाजी राजे म्हणाले, मी त्यांच्या विकासावर टीका टिपणी केली नाहीये, मला इथे वाटला की इथे विकास झालेला नाही तो मी त्यांच्या पुढे प्रश्न ठेवला. राज्यात तुमचे सरकार आहे, केंद्रात तुमचे सरकार आहे म्हणून हे तुम्ही हे प्रश्न सोडवावेत. हे प्रश्न जर तुम्ही सोडवलेत तर तुम्ही तुम्हाला येऊन शाब्बासकी देईल. परंतु आज येवलाला आल्यानंतर मी खुश व्हायला पाहिजे परंतु मी व्यथित झालो. अनेक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडले आणि तेच प्रश्न मी भाषणासमोर सादर केले आहेत असे संभाजी राजे म्हणाले.