संभाजीराजे छत्रपतींच्या कार्यकर्त्यांची सेना भवनसमोर बॅनरबाजी

भाजपने राज्यसभेच्या आपल्या तीनही जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवार यांना धूळ चारली. त्यामुळे भाजपाने ऐनवेळी मत फोडण्यासाठी खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने नकार दिला होता. उमेदवाराचा पराभव झाल्यावर संभाजीराजे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली होती. आता त्यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनाबाहेर बॅनर लावून जखमेवर मीठ चोळले आहे.

    मुंबई : राज्यसभा निवडणुकी(Rajyasabha Election)त शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पवार भाजप(BJP)चे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे. दोन्ही उमेदवार कोल्हापूरातीलच असल्याने अटीतटीची झुंज पहायला मिळाली. मात्र, यापूर्वी महाविकास आघाडी(MVA)तर्फे इच्छूक असलेले संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना शिवसेनेने तिकीट नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी दादर येथे शिवसेना भवन (Shivsena Bhawan) समोर बॅनर (Banner) लावला आहे.

    भाजपने राज्यसभेच्या आपल्या तीनही जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवार यांना धूळ चारली. त्यामुळे भाजपाने ऐनवेळी मत फोडण्यासाठी खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने नकार दिला होता. उमेदवाराचा पराभव झाल्यावर संभाजीराजे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली होती. आता त्यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनाबाहेर बॅनर लावून जखमेवर मीठ चोळले आहे.

    ‘आज पुन्हा एकदा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे…. छत्रपती शिवरायांचा…. शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे जाहीर आभार” अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनाच्या बाहेर लावण्यात आले आहेत. “राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य अभी बाकी है…जय शिवराय” असाही इशारा यातून देण्यात आला आहे. दरम्यान या बॅनरवर संभाजीराजे छत्रपती यांचा फोटो आहे.