राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांकडून शहरात रेड अलर्ट, अकोल्यात संचारबंदी काढून जमावबंदी लागू; तर शेवगावात…

शनिवारी रात्री अकोल्यात दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर हिंसाचार आणि दंगल घडली. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी अहमदनगरमधील शेवगावात दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

    छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनंगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) राम नवमीच्या आदल्या रात्री दंगल झाली होती. यानंतर शनिवारी रात्री अकोल्यात (Akola) दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर हिंसाचार आणि दंगल (Riot) घडली. मागील काही दिवसांत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किरकोळ कारणावरुन दोन गटांमध्ये वाद होण्याच्या घटना सतत घडताना पाहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शनिवारी रात्री अकोल्यात दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर हिंसाचार आणि दंगल घडली. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी अहमदनगरमधील शेवगावात दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. समाजकंटकांकडून दंगली घडविण्याचा हेतू असल्यानं पोलीस अॅक्शन मोडवरती आले असून, समाज माध्यमांवरून जो कोणी आक्षेपार्ह मेसेज पाठवले किंवा दंगली भडकवण्यास परावृत्त करेल, भडकावू पोस्ट करेल, त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

    अकोल्यात 5 पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी

    दरम्यान, शनिवारी रात्री अकोल्यात दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर हिंसाचार आणि दंगल घडली. यात वेळीच पोलिसांनी दंगलीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, तरी सुद्धा या दंगलीत चार पोलीस जखमी झाले आहेत, तर दंगलीतील कित्येक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी व राविवारी येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, तसेच अकोल्यात संचारबंदी काढून आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अकोल्यात 5 पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    अकोलामधील दंगलीच्या घटनेनंतर अमरावतीत पोलीस अलर्ट
    दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 सेकंदांचा आक्षेपार्ह व्हिडिओ अमरावतीच्या नावाने केला होता व्हायरल, त्यामुळं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या दोन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. दोन्ही ठिकाणी दोन गट आमने-सामने आल्याने जोरदार दगडफेक करण्यात आली. ज्यात अकोल्यात एकाचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

    संभाजीनगर पोलिसांकडून शहरात रेड अलर्ट

    राज्यातील विविध भागात घडत असलेल्या घटनांचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) उमटू नयेत, तसेच पोलिसांची तत्परता दिसून यावी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी अलर्ट जारी केला आहे. अशा घटनांचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात उमटू नयेत, म्हणून शहर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं आता पोलीस देखील अँक्शन मोडवर आले आहेत.