छत्रपती संभाजीराजेंनी १२० लढाया जिंकत पराक्रम गाजवला : रावसाहेब घुमरे

नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

    नेवासा : नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी उपस्थितांनी शिवा की जय बोलो…संभा की जय बोलो…या घोषणांनी परिसर दणादून सोडला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्षा सोनल पाटील या होत्या. तर सरपंच सतिश निपुंगे, नगरसेवक सचिन नागपूरे, मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे, ॲड. मयुर वाखुरे, जेष्ठनेते भास्करराव कांबळे (अंकल), सुनिल मोरे, संजय निपुंगे, कार्यक्रमाचे संयोजक आरक्षण समितीचे रावसाहेब घुमरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    यावेळी घुमरे-पाटील म्हणाले की, मराठा सम्राट असण्यासोबतच संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. छत्रपती संभाजीराजेंनी १२० लढाया जिंकत पराक्रम गाजवला छञपतींच्या कार्याचा गुणगौरव हा अविस्मरणीय असल्याचे यावेळी बोलताना घुमरे – पाटील यांनी आपले विचार मांडले. यावेळी विविध मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.