
समीरची हत्या करण्यापूर्वी सर्व आरोपी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आकाश जैसवाल याच्या संपर्कात होते.
कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) चार दिवसापूर्वी एका अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. समीर लोखंडे (Sameer Lokhande) असे अल्पवयीन तरुणाचे नाव होते. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात १० ते १२ जणांच्या विरोधात काही तरुणांना अटक केली. मात्र या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. समीरची हत्या करण्यापूर्वी सर्व आरोपी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आकाश जैसवाल याच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली होती. त्या दिवशी आकाश हा भाजप मोर्चात सहभागी होता. मात्र मोबाईलच्या सीडीआरमुळे आकाश जैसवालला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
कल्याण पूर्वेत राहणारा समीर लोखंडे याला काही तरुणांनी अपहरण करुन एका ठिकाणी नेले. त्याठिकाणी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. ज्या तरुणाने त्याला मारहाण केली होती. त्यापैकी एका तरुणासोबत समीरचे भांडण झाले होते. ज्या तरुणाने अन्य तरुणासह मारहाण केली. तो तरुण देखील अल्पवयीन आहे. जबर मारहाणीनंतर समीरवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. समीरच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन तरुणांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. या नंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.
या प्रकरणात आणखीन काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे भाजप युवा मोर्चा सरचिटणीस आकाश जैसवालला (Akash Jaiswal) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश जैसवाल हा केडीएमसीच्या भाजप माजी उपमहापौर विक्रम तरे यांचा निकटवर्तीय आहे. ज्या दिशवी समीरला मारहाण केली जात होती. तेव्हा आकाश हा भाजपच्या निषेध मोर्चात सहभागी होता. मात्र या प्रकरणातील फिर्यादीने आकाश जैशवाल याचे नाव घेतल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मोबाईल सीडीआर मध्ये आकाशचे नाव समोर आले. घटनेच्या पूर्वी आकाश हा आरोपींच्या संपर्कात होता.