समीर वानखेडेंची 22 मे पर्यंत अटकेपासून सुटका, एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर समीर वानखेडेंच्या वकिलांचे गंभीर आरोप, याचिकेत शाहरुख खानसोबत झालेल्या संभाषणाचे चॅट

    Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्यावर मॉडेल मुनमुन धमेचा हिने गंभीर आरोप करीत 25 कोटींची खंडणी मागितली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावर आता सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर समीर वानखेडेंनी यावर याचिका दाखल केली आहे. त्यावर माननीय न्यायालयाने 22 मे पर्यंत समीर वानखेडेंना अटक करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे. तरीही या निर्णयामुळे समीर वानखेडेंची अटकेपासून सुरक्षा झाली आहे.
    आता समीर वानखेडेंच्या वकिलांनी माध्यमांसमोर येत, एनआयएच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, मूळात आरोपपत्रच नष्ट केले आहे, असे असताना एनआयएच्या अधिकाऱ्यांनी समीरला त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आता त्यांनी समीर विरोधात खंडणीची याचिका दाखल केली आहे. तसेच, सीबीआयने यावरून गुन्हा दाखल करीत, त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

    दरम्यान, समीर वानखेडे यांनी याविरोधात याचिका दाखल करीत आपले शाहरूख खानबरोबर संभाषण झाले, परंतु कुठेही पैशांची चर्चा झाली नाही. असा दावा केला आहे. समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यामध्ये अनेकदा संभाषण झाल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेतून त्यांनी मांडली आहे. मुलाला सोडवण्यासाठी शाहरुखने विनंती केल्याचं याचिकेत नमूद करण्यात आल्याची धक्कायक माहिती पुढे येतेय. समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान यांचं व्हॉट्सअप चॅट कोर्टासमोर आलेलं आहे. त्यांमध्ये त्यांनी त्या चॅटचे फोटोदेखील पाठवले आहेत.
    मीर वानखेडे यांच्या याचिकेमधून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्या घरावर देखील छापेमारी देखील केली होती. या प्रकरणात वानखेडे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच प्रकरणात सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश होता.
    सीबीआयच्या एफआयआरमध्ये काय म्हटलंय?
    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं.
    आता समीर वानखेडे यानी थेटपणे शाहरुख खानने विनंती केल्याचं याचिकेत नमूद केल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.