
शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण जखमी झालेत. या अपघाताप्रकरणी चालकासह दोन आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण जखमी झालेत. या अपघाताप्रकरणी चालकासह दोन आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.
प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर, असं आरटीओ अधिकारी यांचं नाव असून ते आरटीओ कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. परिवहन विभागाच्या आयुक्तांनी या दोघांचं तात्काळ निलंबनही केलं आहे.
ट्रक चालक आणि दोनही आरटीओ अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. अपघात होताच आरटीओ अधिकारी त्या ठिकाणाहून पळून गेले होते. नंतर त्यांनीच अपघात झाल्याचा फोनही केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे.
नेमकं काय आहे घटना?
दरम्यान, शनिवारी मध्यरात्री नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खाजगी टम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला. समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते, असं सांगण्यात येत आहे. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.