‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड’; सनातन धर्माबाबत जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट

बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पंडित धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) हे मुंबईतील मीरा रोड येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी सनातन धर्माबाबत अनेक विधाने केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात त्याबाबत चर्चा सुरु झाल्या.

मुंबई : बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पंडित धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) हे मुंबईतील मीरा रोड येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी सनातन धर्माबाबत अनेक विधाने केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात त्याबाबत चर्चा सुरु झाल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत यावर सविस्तर भाष्य केले. ट्विट करत त्यामध्ये म्हटले की, ‘विधानसभेत लोकांच्या ह्रदयात काय आहे ते स्पष्टपणाने बाहेर आले. माझे भाषण सुरु असताना सनातन धर्माला आम्ही स्वीकारणार नाही, त्याला कायम विरोध करणार, असे बोलताच भाजपच्या आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी सनातन धर्म की जय हो !’ या घोषणा द्यायला सुरुवात केली. ह्याचे मला आश्चर्यच वाटले’.

पंडित धीरेंद्र शास्त्री हे मुंबईत आल्यानंतर अनेक मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, आता भारत हिंदू राष्ट्र राहील. लोक काय म्हणतात त्यामध्ये पडू नका. जे कच्चे असतात तेच बोलतात. आम्हाला बालाजीचा आशीर्वाद आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. लोक म्हणतात चमत्कार घडत नाहीत, पण बापाला बाप म्हणणे हा चमत्कार नाही तर काय, असे त्यांनी म्हटले होते.

यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘आज विधानसभेमध्ये लोकांच्या ह्रदयात काय आहे ते स्पष्टपणाने बाहेर आले. माझे भाषण सुरु असताना सनातन धर्माला आम्ही स्विकारणार नाही, त्याला कायम विरोध करणार, असे बोलताच भाजपच्या आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी सनातन धर्म की जय हो !’ या घोषणा द्यायला सुरुवात केली. ह्याचे मला आश्चर्यच वाटले. अनेक सदस्य शाब्दिक रुपांनी माझ्या अंगावर येत होते. मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम होतो की, सनातन धर्म आम्ही स्विकारणार नाही. आम्ही टोकाचा विरोध करु.

गौतम बुद्धांकडून पहिल्यांदा आव्हान

सनातन धर्माला पहिल्यांदा आव्हान बुद्धांनी दिले व माणुसकीचा ऱ्हास होतो म्हणून सनातन धर्म मान्य नाही, अशी बुद्धांची त्यानंतर महावीर जैन यांची भूमिका होती. किंबहुना सनातन धर्मातून बाहेर जाऊन बुद्ध धर्माची आणि जैन धर्माची स्थापनाच विद्रोहातून झाली. त्यानंतर बसवेश्वर महाराज आले. त्यांनी देखील सनातन धर्माला विरोध केला आणि लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यानंतर चक्रधर स्वामी आले.

हे आमचं दुर्दैव

सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत. हे आमचं दुर्दैव आहे. सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय? हे आपण समजूनच घेत नाही. ते सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडून आपल्या हातात देतात. पण, सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच हजारहून अधिक वर्षे येथे वर्णव्यवस्था राबवली, असेही त्यांनी म्हटले आहे.