Bacchu Kadu

सन २०१६-१७ या वर्षी महात्मा बसवेश्वर समता-शिवा पुरस्कारासाठी व्यक्ती म्हणून प्रा.मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली होती.

    मुंबई : वीरशैव – लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक व समाजसेवक असलेल्या व्यक्ती आणि संस्थांची निवड शासनाने केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू यांनी दिली आहे.

    सन २०१७-१८ या वर्षाकरिता महात्मा बसवेश्वर समता-शिवा पुरस्कार नागपूर येथील अभय मनोहर कल्लावार या व्यक्तीला तर वीरमठ संस्थान, ता.अहमदपूर, जि.लातूर या संस्थाची निवड करण्यात आली आहे. सन२०१८-१९ करिता नांदेड येथील विठ्ठल बळीराम ताकबीडे यांची निवड करण्यात आली आहे. सन २०१९-२० करिता पुणे येथील उमाकांत गुरूनाथ शेटे या व्यक्तीला तर महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फलकळस, ता.पुर्णा जि.परभणी या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

    सन २०२०-२१ या वर्षाकरिता लातूर येथील रामलिंग बापूराव तत्तापुरे या व्यक्तीची निवड करण्यात आली असून तीर्थक्षेत्र आदि मठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता.पाठण, जि.सातारा या संस्थेची निवड करण्यात आली आहे. सन २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता नवी मुंबई येथील डॉ.यशवंतराव बाबाराव सोनटक्के यांची निवड करण्यात आली तर सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डिंग, बसवेश्वर नगर, नांदेड या संस्थेची महात्मा बसवेश्वर समता-शिवा पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे.

    सन २०१६-१७ या वर्षी महात्मा बसवेश्वर समता-शिवा पुरस्कारासाठी व्यक्ती म्हणून प्रा.मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली होती. पुरस्कार म्हणून त्यांना अनुक्रमे २५ हजार आणि ५१ हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे, अशी माहिती राज्यमंत्री कडू यांनी दिली आहे.