Sand mafia's deadly attack on Bhadravati tehsildar

तहसीलदारांचे वाहन २० फुटापर्यत फरफटत नेले. यात तहसीलदार यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. नायब तहसीलदार शंकर भांदक्कर यांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

    भद्रावती : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्या गाडीला मारण्याच्या हेतूने ट्रॅक्टरने मागून जोरदार धडक देऊन प्राणघातक हल्ला केला. ही घटना २९ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

    धडक इतकी जोरदार होती की, तहसीलदार यांचे वाहन सुमारे २० फूट अंतरा पर्यंत फरफटत नेले. त्यानंतर ट्रॅक्टर समोर जाऊन पलटी झाले. या घटनेची माहिती मिळताच शेगांव व भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यात तहसीलदार डॉ. अनिकेत सोनवणे यांच्या उजवा हाताला गंभीर दुखापत झाली असून सहकारी नायब तहसीलदार शंकर भांदक्कर, विलोडाचे तलाठी कैलास पुसनाके, तलाठी श्रीकांत गीते सुदैवाने बचावले.

    गुप्त माहितीच्या आधारे कारवाईसाठी गेले होते तहसीलदार

    विलास पांडूरंग भागवत (४०) वर्ष राहणार चंदनखेडा असे  ट्रॅक्टर चालक-मालकाचे नाव आहे. हा टॅक्टर क्रमांक एमएच ३४ बीजी २३४३ यांनी रेती या घाटावरून रेती चोरून नेत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार डॉ. सोनवणे यांना मिळाली. दरम्यान तहसीलदारांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वाहनाने कारवाईसाठी चंदनखेडा परिसर गाठले. ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रॅक्टर थांबवत नव्हते. दरम्यान दोन ते तीन वेळा ओवरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ट्रॅक्टरला ओवरटेक करून थांबवले. यावेळी ड्रायव्हर आणि लेबर पळून गेले व नायब तहसीलदार शंकर भांदक्कर हे गाडीच्या खाली उतरून ट्रॅक्टर जवळ गेले असता ट्रॅक्टर मालक विलास भागवत याने ट्रॅक्टरचे स्टिअरिंग आपल्या हातात घेऊन ट्रॅक्टरने शासकीय गाडी एमएच ३४ बीएफ ०७९९ मागून जोरदार धडक दिली. त्यावेळी गाडीमध्ये तहसीलदार अनिकेत सोनवणे बसून होते लगेच त्याला ट्रॅक्टर खाली उतरवून भद्रावती पोलिसांना माहिती देवून घटनास्थळी बोलाविले.

    तहसीलदारांच्या हाताला गंभीर दुखापत

    यात तहसीलदारांचे वाहन २० फुटापर्यत फरफटत नेले. यात तहसीलदार यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. नायब तहसीलदार शंकर भांदक्कर यांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.