Sandalwood trees are on the radar of smugglers smuggled at knifepoint in government residences

काही दिवसांपूर्वी उपवनसरंक्षक (Conservator of Forests) यांच्या निवासस्थानातून जवळपास एक ते दीड लाखांच्या चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यानंतर काल पुन्हा एकाच रात्री दोन शासकीय बंगल्यामधून चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) अधीक्षक यांचा निवासस्थानातून चौकीदाराला धारदार शस्त्र व चाकूचा धाक दाखवून चंदनाच्या झाडाची तस्करी करण्यात आली.

  यवतमाळ : यवतमाळ शहरात चंदन तस्करांनी (Sandalwood smugglers) हैदोस घातला असून शासकीय निवासस्थानातील (Government residence) चंदनाची झाडे तस्करांच्या रडारवर आहेत. अशातच आज बुधवारी पुन्हा प्रादेशिक वनसंरक्षक यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) अधीक्षक यांचा निवासस्थानातून चौकीदाराला धारदार शस्त्र व चाकूचा धाक दाखवून चंदनाच्या झाडाची तस्करी करण्यात आली. या घटनेमुळे वनवृत्तात एकच खळबळ उडाली.

  जंगलांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने वनविभागाची निर्मिती केली आहे. वन अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वनांच्या रक्षणाची जबाबदारी आहे. मात्र, यवतमाळ शहरात गेल्या काही महिन्यापासून आक्रितच घडत आहे. घरफोडीच्या घटनांपाठोपाठ आता चोरट्यांची नजर चक्क शासकीय बंगल्यातील चंदनाच्या झाडांवर दिसून येत आहे. गत काही दिवसांपूर्वी उपवनसरंक्षक (Conservator of Forests) यांच्या निवासस्थानातून जवळपास एक ते दिड लाखांच्या चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यानंतर काल पुन्हा एकाच रात्री दोन शासकीय बंगल्यामधून चंदनाचे झाडे चोरून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे.

  यातील पहिली घटना ही वनसंरक्षक (प्रा.) यवतमाळ घुले यांचे शासकीय निवासस्थानी घडली. येथील चौकीदार आत्मराम भोदूजी चव्हाण (५५) व त्याचा जोडीदार शंकर दत्ताराम ताटकर हे दोघेही रात्रपाळी चौकीदारीची ड्युटी करीत होते. रात्रीपाळी दरम्यान त्यांनी दोन वेळा परीसराचा फेरफटका मारून चहूबाजुनी पाहणी केली.  त्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास परत निवासस्थानाची चारही बाजूने पाहणी करण्या करीता गेले असता निवासस्थानाच्या पाठी मागील बाजूस असलेले चंदनाचे झाड कोणीतरी कापून चोरुन नेल्याचे उघडकीस आले.

  घटनेनंतर त्यांनी तात्काळ आर.एफ.ओ.शंकरराव मडावी (RFO Shankarao Madavi) यांना सदर घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक दिगोळे यांनी सदर ठिकाणी येवून कापून चोरुन नेलेल्या चंदनाच्या झाडाचा पंचनामा केला. चोरी गेलेले चंदनाचे झाड हे ६ फुट उंचेचे असून त्याची किंमत १ लाख ३० हजार रुपये एवढी आहे. त्यानंतर प्रादेशिक वनसंरक्षक यांच्या शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक दिपक सोनटक्के यांच्या ‘नक्षत्र’ (Nakshatra) शासकीय निवासस्थानातून देखील दोन चंदनाचे झाड चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याठिकाणी असलेल्या चौकादारांना चाकूचा व धारधार शस्त्राच्या धाक दाखवून चंदन तस्करांनी चंदनाची झाडे चोरी केल्याचे सांगितले जात आहे.

  दोन महिन्यानंतर तिसरी घटना

  मागिल दोन महिन्यापूर्वी उपवनसरंक्षक यांच्या निवासस्थान परिसरातील एक ते दीड लाख रुपयांच्या दोन चंदनाच्या झाडावर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी ८ जूनला शहर पोलीस ठाण्यात उपवन संरक्षक तुषार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर २२ जुलैला पुन्हा त्याच ठिकाणी चंदनाची झाडे चोरून नेल्याच प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान ३ ऑगष्ट २०२२ रोजी पुन्हा प्रादेशिक वनसंरक्षक यांच्यासह सार्वजनिक बांधकाम अधिक्षक यांच्या निवासस्थानी चंदनाचे झाडे चोरुन नेली. सलग होत असलेल्या या घटनाक्रमामूळे विविध चर्चेला उधाण आले आहे.