
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याने ४० कोंबड्यांचा फडशा पडला.
संगमनेर : संगमनेर तालुक्यामध्ये पोल्ट्री फार्मवर बिबट्याने हल्ला केला आहे. आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ४० कोंबड्यांचा फडशा पडला आहे. संगमनेर तालुक्यामधील कोठे बुद्रुक येथील शेतकरू हौशीराम डोके यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने थेट पोल्ट्री फार्मची जाळी उचकून आतमध्ये प्रवेश केला. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याने ४० कोंबड्यांचा फडशा पडला. यामध्ये मालक हौशीराम डोके यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोल्ट्री फार्मचे मालक आणि शेतकरी हौशीराम डोके यांनी वन विभागाकडे तात्काळ पंचनामा करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सध्या कोठे बुद्रुक गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. या ठिकाणी बिबट्याची दहशत पाहायला मिळते. त्यामुळे गावामध्ये ठिकठिकाणी पैजारे लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. यावेळी हौशीराम डोके यांनी त्यांची खंत व्यक्त केली आहे. बिबट्याने रात्रीच्या वेळे हल्ला केला आणि जेव्हा ते उठले तोच अपर्यत ४०-५० कोंबड्या मारल्या आहेत.
बिबट्या ज्या जागेतून गुसला होता ती जागा आता तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पोल्ट्री फार्मच्या शेजारी जास्त झाडी असल्यामुळे माणूस बाहेर जाऊ शकत नाही. बिबट्याने लाईटच्या प्रकाशामध्ये हल्ला केला. वन विभागाकडे त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आजूबाजूला असलेल्या झाडी तोडण्याची परवानगी द्यायला हवी असे मागणी हौशीराम डोके यांनी केली आहे. आजूबाजूला झाडी असल्यामुळे एकटं माणूस बाहेर निघू शकत नाही. आजूबाजूची झाडी घरापर्यत आली आहे असे हौशीराम डोके यांचे म्हणणे आहे. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकंदरीत २० ते ४० हजारांचं नुकसान झालं आहे असे मालकाने सांगितले आहे.