‘संघानं तपासावं, कार्यालयात कुठे लिंबू-टाचण्या पडलेल्या आहेत का’, मुख्यमंत्र्यांच्या संघ मुख्यालय दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची काय टीका?

शिंदे गटाने आज मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावरून मोठा राडा झाल्याने दोन्ही गट समोरासमोर आले होते. दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे आज संघ कार्यालयावर ताबा मिळवायला गेले होते का? तसेच, दुसऱ्याचे नेते, पक्ष, कार्यालय पळवायचे असे करतात, असेही ते म्हणाले.

    नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेडगेवार स्मृतीभवन येथे आदरांजली वाहिली. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांना लक्ष्य केले आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते, अशी टीका केली. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही खोचक टोला लगावला आहे.

    शिंदे गटाने आज मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावरून मोठा राडा झाल्याने दोन्ही गट समोरासमोर आले होते. दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे आज संघ कार्यालयावर ताबा मिळवायला गेले होते का? तसेच, दुसऱ्याचे नेते, पक्ष, कार्यालय पळवायचे असे करतात, असेही ते म्हणाले.

    उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही खोचक सल्ला दिला आहे. संघाने तपासावे, कार्यालयात कुठे लिंबू-टाचण्या पडलेल्या आहेत का, असेही ते म्हणाले. शिवसेना भवनवरून आज वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना भवन ताब्यात घेण्याचे मनात नसल्याचे स्पष्ट केलेय तर, भाजप आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे एक दिवस शिवसेना भवनच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणून देतील, अशी मिश्कील टिपण्णी केली आहे.