मानवजातीला काळिमा! सांगलीत पुन्हा तीन घोडींच्या योनीला चक्क तांब्याच्या तारेने शिवले ; अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

रविवारी ॲनिमल राहत संस्थेचे सदस्य प्राणी सेवेचे कार्य करत असताना संस्थेतील डॉ. अजय बाबर यांना तीन घोडी अंदाजे दोन ते तीन वर्ष वयाच्या त्यांच्या योनी  तांब्याच्या तारेने अनैसर्गिक पद्धतीने शिवल्याचे आढळून आले,सदरच्या तीन घोड्या भारती हॉस्पिटल समोर सांगली येते बेवारस  रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आल्या,  घोडींची झालेली ही अवस्था खूप दुर्दैवी, वेदनादायक आणि बेकायदेशीर असल्याचे लक्षात आले.

    सांगली : अज्ञात व्यक्तीने तीन घोडींच्या योनी तारेने शिवल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सांगली शहर पोलीस स्टेशन मध्ये यापूर्वी २०२० ला या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण पोलिसांना असे कृत्य करणारे नराधम सापडले नाहीत. म्हणून तपास बंद करण्यात आला होता.
    रविवारी ॲनिमल राहत संस्थेचे सदस्य प्राणी सेवेचे कार्य करत असताना संस्थेतील डॉ. अजय बाबर यांना तीन घोडी अंदाजे दोन ते तीन वर्ष वयाच्या त्यांच्या योनी  तांब्याच्या तारेने अनैसर्गिक पद्धतीने शिवल्याचे आढळून आले,सदरच्या तीन घोड्या भारती हॉस्पिटल समोर सांगली येते बेवारस  रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आल्या,  घोडींची झालेली ही अवस्था खूप दुर्दैवी, वेदनादायक आणि बेकायदेशीर असल्याचे लक्षात आले. त्वरित ॲनिमल राहतचे प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ पोळ यांनी पोलीस ठाण्यात या  घटनेची माहिती फोन करून दिली आणि पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन फिर्याद दिली, त्यावेळी ठाण्यातील उपस्थित ठाणे अंमलदार भांगरे यांनी त्या घोडींच्या होणाऱ्या वेदनेचा विचार करून तिन्हीही घोडीची हवालदार जावेद अत्तार आणि पोलीस कॉन्टेबल पोपट नागरगोजे यांच्या समोर ॲनिमल राहतच्या पशुवैद्यकीय डॉ.राकेश चित्तोरा, डॉ. विनायक सूर्यवंशी, डॉ. अजय बाबर, गोरखनाथ कुराडे यांच्या मार्फत घोडीना भूल देऊन सदरच्या तांब्याच्या तारा काढून घेतल्या डॉक्टरांनी तांब्याच्या तारा काढताना वेदनाशामक इंजेक्शन ही दिले आणि त्यांना त्रास मुक्त केले. तिन्ही घोडीना रस्तावर जखमी अवस्थेत सोडणे अमानवीय असल्याने आणि रस्तावर वाहतुकीला अडथळा होतं असल्याने ठाण्यातील उपस्थित ठाणे अंमलदारभांगरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार तिन्ही घोडीना सुरक्षित ठिकाणी हलवले.

    सांगली शहरामध्ये रस्त्यावर सर्वत्र घोडे फिरताना दिसतात. त्याचा शर्यतीमध्ये पळवण्यासाठी वापर होतो, शर्यत झाली की त्यांना रस्त्यावर चरण्यासाठी असे बेवारस सोडले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने मादी जास्त असतात रस्त्यावर असे सोडल्या मुळे त्याना इतर नर घोड्याकडून गर्भधारणा होते आणि त्या शर्यत मध्ये काही महिने पळू शकत नाहीत, म्हणून त्याना त्यांच्या मालकांकडून अशा अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्या योनीला वेगवेळ्या पध्दतीने शिवले जाते जेणे करून नर घोड्याकडून गर्भधारणा होऊ नये, पण असे कृत्य करणे ही लाजिरवाणे आणि माणुसकीला काळिमा फासणारे असून या घटना थांबणाव्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतःहा गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षा सर्वसामान्य सांगली कडून होतं आहे.

    - कौस्तुभ पोळ, ॲनिमल राहत