सांगली जिल्ह्यावर जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहणार; सादिक खाटीक यांचा विश्वास

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचेच सांगली जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व राहणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक (Sadik Khatik) यांनी व्यक्त केला.

    आटपाडी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचेच सांगली जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व राहणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक (Sadik Khatik) यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली देशात इंडिया आघाडी निर्विवाद सत्तेवर येणार असून, त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दिसून येणार असल्याचेही सादिक खाटीक म्हणाले.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सांगली जिल्ह्यातील काही नेते सहभागी झाल्याच्या बातम्या व फोटो प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर सादिक खाटीक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शनाखाली देशात इंडिया आघाडी निर्विवाद सत्तेवर येणार असून, त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दिसून येणार आहे. देशात इंडिया आघाडी ३५० पेक्षा जास्त जागाजिंकणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभेचा अपवाद वगळता सर्वच्या सर्व जागा इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडी जिंकणार आहे.

    तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडी जिंकणार आहे. हा अविश्वसनीय चमत्कार देशातील, राज्यातील कोट्यवधी सर्वसामान्य जनता, महिला, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक, ओबीसी प्रवर्गातील घटक घडविणार आहेत, असेही खाटीक यांनी म्हटले आहे.