Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांकडे (Loksabha Election) राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांकडे (Loksabha Election) राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत. असे असताना ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दीना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

    ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईसाठी नावांची निश्चिती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, ठाकरे गटाकडून चाचपणी सुरु आहे. या मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या नावाची चर्चा होती. संजय राऊत यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम देत संजय दीना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगण्यात येत आहे.

    ठाकरे गट चार जागांसाठी आग्रही

    मुंबईतील दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभांच्या जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे.