eknath shinde and devendra fadnavis

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत पुढे जायला नको, अशी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांची भूमिका आहे. शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असताना भाजप आमदार संजय कुटे (Sanjay Kute) गुजरात राज्यातील सूरतमध्ये पोहोचले आहेत.

    मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत शिवसेनेची मत फुटली आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shide And Sanjay Kute Meeting) यांच्यासह अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत. ते सध्या गुजरातच्या सूरतमध्ये (Surat) वास्तव्याला आहेत.

    काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत पुढे जायला नको, अशी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांची भूमिका आहे. शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असताना भाजप आमदार संजय कुटे (Sanjay Kute) गुजरात राज्यातील सूरतमध्ये पोहोचले आहेत.

    सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा मुक्काम आहे. त्यांच्या भेटीसाठी कुटे पोहोचले. त्यांची  कार हॉटेलबाहेर असलेल्या पोलिसांनी अडवली. यानंतर फोनाफोनी झाली. पोलिसांनी कुटे यांची चौकशी केली. त्यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर कुटेंची कार आतमध्ये सोडण्यात आली. संजय कुटे हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन हॉटेल मेरिडियनमध्ये गेल्याची चर्चा आहे.