संजय निरुपम यांनी केली संजय राऊतांवर टीका, संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे…

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

  मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अश्यातच आज संजय निरूपमी यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे किंग आहेत, राऊतांच्या कुटुंबियांकडून १ कोटी रुपयांची दलाली करण्यात आली होती, असे म्हणत संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाले अमोल कीर्तिकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

  संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग

  ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल कीर्तिकर यांची ईडीकडून चौकशी सुरु असून त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. यावर बोलताना संजय निरुपम म्हणाले, खिचडी चोराला आज समन्स मिळाला आहे. या घोटाळ्यामध्ये आणखीन काही जण आहेत. माझ्या मित्राबद्दल वाईट बोलतोय, अमोल कीर्तिकारांना अटक करा, असे संजय निरुपम म्हणाले.

  संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे किंग आहेत. हा घोटाळा झाला आहे यामध्ये संजय राऊत यांनी आपली पत्नी भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे घेतले. सहयाद्री रिफ्रेशमेंटला खिचडीचा कंत्राट मिळाला होता. हे कंत्राट ६ कोटी रुपयांचे होते. त्यातील १ कोटी रुपये संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळाले होते. विधिता राऊत संजय राऊत यांची मुलगी आहे, तिच्या खात्यावर पैसे आले आहेत, असा आरोप संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर केला आहे.

  संजय राऊत यांच्या कुटुंबियांकडून १ कोटी रुपयांची दलाली झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला होता. संदीप राऊत यांना देखील सहयाद्री रिफ्रेशमेंटकडून चेक आले होते. त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. सहयाद्री रिफ्रेशमेंट ३०० ग्राम खिचडी पॅकेट सप्लाय करण्याचा कंत्राट मिळाला होता, असे संजय निरुपम म्हणाले.

  संजय राऊत यांना ईडीने अटक करावी

  अमोल कीर्तिकर हे फक्त खिचडी चोरच नाही, तर संजय राऊत देखील खिचडी चोर आहेत. सहयाद्री रिफ्रेशमेंटने खिचडी वाटपाचे कंत्राट दिले होते. सह्याद्री रिफ्रेशमेन्टने खूप मोठा घोटाळा केला आहे. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाइव्ह करून नागरिकांसोबत संवाद साधत होते. ईडीने चौकशी करत असताना सहयाद्री रिफ्रेशमेंट सोबत संजय राऊत यांना सुद्धा अटक करावी. राऊतांवर गुन्हा दाखल करावा. मुंबईतील मराठी माणसांवर तुम्ही राजकारण करत आहात, अमोल कीर्तिकर तर खिचडी चोर आहेतच, ज्यांनी उमेदवारी त्यांना दिली ते सुद्धा खिचडी चोर आहेत, असे म्हणत संजय निरुपम यांनी कीर्तिकर आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.