मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला, संजय राऊत यांनी शिंदे गटावर सोडले टीकास्र

“सर्वांत जास्त खोके बुलढाण्यात आले आहे. एक फुल, दोन हाफ. एक खासदार दोन आमदार. आज ते नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि रेडे गुवाहाटीला गेले”, असेही ते म्हणाले.

    बुलढाणा- मुख्यमंत्री आज नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज महाराष्ट्राची सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि ४० रेडे गुवाहाटीला नवस फेडण्यासाठी गेले, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

    “आज समोर पेटलेल्या मशाली आहेत. या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत. आज ही भूमी जिजाऊंची भूमी आहे. ज्या मातेने आम्हाला शिवाजी राजा दिला. त्या भूमीत आज गद्दारांची बीज रोवली गेली आहेत. ती बीज कायमची नष्ट करण्यासाठी या मशीली पेटल्या आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

    “सर्वांत जास्त खोके बुलढाण्यात आले आहे. एक फुल, दोन हाफ. एक खासदार दोन आमदार. आज ते नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि रेडे गुवाहाटीला गेले”, असेही ते म्हणाले.

    “हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. बाजुला शेगाव आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते आणि मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले. हे या राज्याचे दुर्देव आहे. एकही खोकेवाला पुन्हा निवडून येता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे”, असेही ते म्हणाले