
सध्या अधिवेशनात नागपूर सुधार प्रन्यास जमीन विक्री घोटाळा चांंगलाच गाजतोय. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला सध्या धारेवर धरलं आहे. यावरुनही संजय राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले.
नागपूर : नागपूर येथील अधिवेशनात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, नागपूर सुधार प्रन्यास जमीन विक्री घोटाळा, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण, सीमावाद ‘ईएस’ प्रकरण, गायरान जमीन घोटाळा, मंत्री राजीनामा या विषयावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चागंचीच खडाजंगी सुरू असल्याच पाहायला मिळत आहे. तर, यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षाचे नेते असताना विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला होता. आज सत्तेत बसल्यावर भ्रष्टाचाराचे प्रकरण जे विरोधी पक्ष काढत आहे. तो बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहे. एवढे देवेंद्र फडणवीस कसे बदलले. अशी टिका संजय राऊतांनी केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नागपूरला आलो आहे. आम्ही म्हणालो काही बॉम्ब फोडू. काल उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, वाती तयार आहे. अजून अधिवेशन संपलं नाही. सीमा प्रश्नावरचा ठराव अत्यंत महत्वाचा आहे. ज्याप्रकारे ठराव तयार केला तो अतिशय भुलसट आहे. त्या ठरावात संपूर्ण प्रदेश केंद्र शासित करावा याचा उल्लेख नाही.
NIT भूखंड भष्ट्राचारावरुन हल्लाबोल
सध्या अधिवेशनात नागपूर सुधार प्रन्यास जमीन विक्री घोटाळा चांंगलाच गाजतोय. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला सध्या धारेवर धरलं आहे. यावरुनही संजय राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले. NIT भूखंड हा काय लवंगी फटाके आहे. विधानसभा अध्यक्ष विरोधीपक्षाचा आवाज दाबत आहे.ते व्हेलमध्ये येऊन भाजप घोषणा देणे राहिले.अशा परिस्थितीतीत अणूबॉम्ब फोडून फायदा नाही. संपूर्ण सरकार अडचणीत आहे. अशी टिका त्यांनी केली
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा
महाराष्ट्र सरकारची नामर्दाची भूमिका आहे. बुलचट ठराव आहे.बोटचेपी भूमिका का घेता. शिवसेनेची भूमिका योग्य आहे. काही अडचणी होणार नाही.आधी त्यांची सुटका करा. सीमा प्रश्नाबाबत आम्ही सगळे एक आहोत.काल उद्धव ठाकरे यांनी सीमा बाबत जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका राहील. असेही राऊत म्हणाले.