‘ज्याने बाळासाहेबांशी गद्दारी केली, तो संपला’; बंडखोर आमदारांवर संजय राऊत भडकले!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान राऊतांनी शिंदे गटाला दिलं आहे.

    शिवसेनेशी बंड करून टिकेचे धनी ठरलेले आमदार आज पुन्हा खासदार संजय राऊतांच्या ( sanjay Raut ) टारगेटवर होते. जे शिवसैनिक स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणत आहेत, पण बाळासाहेबांचे शिवसैनिक पाठित खंजीर खुपसण्याचे काम करीत नाहीत. ‘ज्याने बाळासाहेबांशी गद्दारी केली, तो संपला’ असं म्हणत बंडखोर आमदारांवर चांगलेच भडकले.

    आज शिवसेनेच्या समर्थनार्थ लाखो शिवसैनिक रस्त्यावर आहेत. आम्ही एक इशारा करण्याचाच उशीर आहे, पण आम्ही संयम बाळगून आहोत, असा थेट इशाराच आता शिवसेना नेते संजय राऊत  यांनी दिला आहे.

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान राऊतांनी शिंदे गटाला दिलं आहे. तसंच जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही असंही राऊतांनी म्हटलं आहे. तुमच्याकडे 54 आमदार असून द्या, राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.