पत्रकार वारिसे यांच्या हत्येमागे असलेल्या मास्टरमाईंडला अटक करा, शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

या प्रकरणात ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याचा बोलविता धनी कोण आहे, हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे. त्या बोलवित्या धन्याला अटक झाली पाहिजे असं त्यांनी म्हण्टलं.

    नवी दिल्ली- कोकणातल्या रिफायनरीविरोधात (Kokan Refinery) आवाज उठवणाऱ्या पत्रकार वारिशे
    (journalist shashikant varise)  यांची हत्या हे धक्कादायक प्रकरण असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवलं असून, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रस्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात चाललंय काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे. या प्रकरणात ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याचा बोलविता धनी कोण आहे, हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे. त्या बोलवित्या धन्याला अटक झाली पाहिजे असं त्यांनी म्हण्टलं. हे प्रकरण शिवसेना गांभिर्यानं घेतलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

    काय म्हणाले संजय राऊत

    शशिकांत वारिसे यांचे वाहिलेलं रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं विशेष टीम पाठवून याचा आणि आधी कोकणात झालेल्या हत्यांचा तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. रिफायनरी विरोधकांसोबत ठाकरे गट आहे. रिफायनरी विरोधकांवर पोलिसांचा दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वारिसे यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केलीय. या प्रकरणात आपल्यालाही धमक्या येत असल्याचंही राऊत यांनी सांगितलंय. हा सराकरनं घेतलेला बळी आहे, अ्संही राऊत म्हणालेत. आता शिवसेना नेते वारिसे कुटुंबीयांची भेटही घेणार आहेत.

    आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा आरोप

    रिफायनरी होणार असं जाहीर झाल्यापासून त्या परिसरातील जागा अनेकांनी घेतल्या आहेत. त्यात अनेक बड्या लोकांनी जमिनी घेतल्या होत्या. त्याचा पर्दाफाश वारिसे करीत होते. त्यामुळं वारिसे काही नेत्यांच्या डोळ्यात खुपत होते. त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलंय. लवकरच या भागात कुणीकुणी जमिनी घेतल्या त्याची यादीच जाहीर करु, असंही राऊत म्हटलंय.

    उपमुख्यमंत्र्यांनी कणकवणीच्या यात्रेच्या वेळी धमक्या दिल्या

    कणकवली यात्रेच्या वेळी दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सभा झाली. त्या सभेत झालेल्या भाषणात रिफायनरी विरोधकांना धमक्या देण्यात आल्या. कोण आडवं येतंय ते बघूच, असा इशारा देण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी वारिसे यांची हत्या झाली, याचा अर्थ काय काढायचा, असा प्रश्न राऊत यांनी विचारलाय. सत्ता बदलानंतर कोकणातील हत्यांचं सत्र पुन्हा सुरु झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे या हत्यांशी ही हत्या जोडत असल्याचं त्यांनी सांगितलं. वारिसे प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.