
भारतीय जनता पार्टीची कटपुतली बनली आहे. आमच्या वेळेला देखील शिंदे गटातले नेते कोणत्या आधारावर आमचा विजय होईल? असं म्हणत होते
संजय राऊत : आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही आमच्या विचारधारा घेऊन रॅली काढत आहोत. जी २० च्या वेळी सर्वत्र न जाता मोदी हे गांधींच्या पुतळ्याजवळ गेले. त्यांना विचारा ते का गेले? आम्ही मे भी हूँ गांधी ही रॅली काढत आहोत. या निवडणुकीत भारत पाकिस्तान नाही, भारत खलिस्तान होणार. इतके महान विश्वगुरू महासत्ता आणि आज गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखल जात आहे. निवडणूक येण्यापूर्वी हळूहळू या वरचा पडदा पडेल अशी टीका संजय राऊतांनी मोदी सरकारवर केली आहे.
पुढे ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांना भारतीय निवडणूक आयोगाने अध्यक्ष बनवल असेल. आमच्या वेळेला देखील शिंदे गटातले काही नेते तारखा देत होते. आज प्रफुल्ल पटेल हे काम करत आहेत. हे स्वतंत्र संस्था राहिली नाही. ही भारतीय जनता पार्टीची कटपुतली बनली आहे. आमच्या वेळेला देखील शिंदे गटातले नेते कोणत्या आधारावर आमचा विजय होईल? असं म्हणत होते अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.
पुढे ते म्हणाले, जनरल साहेब स्वतः आर्मीचे प्रमुख होते. तेव्हा त्यांना ही संधी मिळाली होती, पीओके ला भारतात आणायची. प्रथम मणिपूर आपल्या देशात वाचवून ठेवा. प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि जनरल यांनी मनिपुर वर बोलावं. मणिपूर वाचणार की नाही यावर बोला. मराठी माणसाची महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. त्यांना ही ही परिस्थिती आणायची होती, त्यामुळे शिवसेना तोडली आणि दाबली. एकनाथ शिंदे आणि त्याचे लोक हे महाराष्ट्रासाठी बेईमान आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, त्या ठिकाणी इतिहास होतो. ५० ते ५५ वर्षापासून आम्ही हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करत आहोत. हे बेईमान लोक आता त्यावर दावा करत आहेत. हीच कमजोर करण्यासाठी वृत्ती आहे असे संजय राऊत म्हणाले.