भाजप फक्त जिंकले आहे…विजयी झाले नाहीत, राज्यसभा निवडणूक निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकरामधील शिवसेने नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाली आहे. दरम्यान भाजपच्या दणदणीत विजयावर शिवसेनेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, “ठीक आहे, आज ते जिंकले, उद्या पाहू”. “तुम्ही जिंकलात पण विजय झाला नाही, भाजप फक्त जिंकले आहेत, विजयी झाले नाहीत” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

    मुंबई : राज्यसभा निवडणूक निकाल (rajya sabha election result) राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. शुक्रवारी झालेल्या राज्यातील राज्यसभेच्या सहा जागेवर निवडणूक झाली होती. याचा आज पहाटे तीन वाजता निकाल आला. हि निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची करण्यात आली होती. ९ तासांच्या नाट्यमय घडामोंडीनंतर आज पहाटे तीन वाजत निकाला आहे. आणि शिवसेनेच संजय पवार यांनी हरवत भाजपाचे धनंजय महाडिक हे विजयी झाले. यानंतर पवार यांनी ३९ मते मिळाली तर, महाडिक यांना ४१ मते मिळाली. या निकालानंतर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत.

    दरम्यान, ९ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांता निकाल अखेर जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने असलेली अपक्षांची मते फुटल्याचे समोर आलेय. महाविकास आघाडी सरकरामधील शिवसेने नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाली आहे. दरम्यान भाजपच्या दणदणीत विजयावर शिवसेनेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, “ठीक आहे, आज ते जिंकले, उद्या पाहू”. “तुम्ही जिंकलात पण विजय झाला नाही, भाजप फक्त जिंकले आहेत, विजयी झाले नाहीत” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

    या निवडणुकीत कुरघोडीचे तसेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला मिळाले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kandes vote rejected) यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचे मत वैध धरण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीने भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाने  दोघांचेही मत वैध ठरवले आहे. पण, सुहास कांदेंच मत अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळं सहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीता आता भाजपाला तीन जागा तर महाविकास आघाडीला तीन जागेवर विजय मिळला आहे.