मोदी मुंबईत, तर राऊत जम्मूत, तिथून थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांना दिलं आव्हान, म्हणाले ‘बाळासाहेबांनी पहिल्यांदा…’

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं, काही वर्षांपासून रखडलेल्या आणि मुंबईसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर ठाकरे गटातील नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे.

    मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi Mumbai Visit) आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ३८ हजार ८०० कोटींच्या विकासकामांचं लोकापर्ण आणि काही कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं, काही वर्षांपासून रखडलेल्या आणि मुंबईसाठी (Mumbai) महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर ठाकरे गटातील नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत सध्या जम्मूमध्ये आहेत. तिथून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. बेळगावमधील मराठी बांधवांवरती अत्याचार करू नका, अशी सूचना देऊन त्याबाबत महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांनी घोषणा करावी, असं आवाहन संजय राऊत यांनी दिलं आहे. बाळासाहेबांनी पहिल्यांदा मराठी जनांच्या हिताचा विचार केला होता.

    अनेक प्रकल्पाची योजना पायाभरणी सुरुवात अनेक अडथळे पार करून शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेने केलेली आहे आणि त्यातील प्रमुख कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, हे शिवसेनेचे यश आहे. शिवसेनेने सुरू केलेला कामांना गती मिळाल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. तसेच नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला आमचा विरोध नसून राजकारण केल्यास बघू, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं आणि भाजप-शिंदे गटाकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते बीकेसी मैदानात मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बीकेसी मैदानात तीन व्यासपीठं उभारण्यात आली आहेत. त्यात मुख्य स्टेजवर पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते असतील. दुसऱ्या स्टेजवर अवधूत गुप्ते यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. तर तिसऱ्या स्टेजवर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.