‘ही हुकूमशाही आहे’, ते पलटूराम नसल्यामुळे हे घडतयं’, हेमंत सोरेनवरील कारवाईवर संजय राऊतांची टिका

हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवर संजय राऊतांनी जोरदार टिका केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली.

  सध्या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) चांगलेच चर्चेत आहे. तब्बल 40 तासांनंतर रांची येथे पोहचले आहेत. अशातच त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून त्यांच आज  चौकशी होणार आहे. त,  कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत हे मात्र, सरकारवर चांगलेच संतापले आहे, ‘ही हुकूमशाही आहे’, हेमंत सोरेन पलटू राम नसल्यामुळे हे घडत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

  काय म्हणाले संजय राऊत

  हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवर संजय राऊतांनी जोरदार टिका केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. हेमंत सोरेन झुकायला तयार नाहीत. तसचं ते नितीश कुमारांसारखे पलटी मारायला तयार नाहीत. हेमंत सोरेन आणि केजरीवाल पलटूराम बनायला तयार नाहीत. त्याची किंमत ते चुकवत आहेत, इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे. असं त्यांनी म्हण्टलं आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  जमीन प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीचे एक पथक सोमवारी दिल्लीतील हेंमत सोरेन यांच्या अधिकृत निवासस्थानी तपासासाठी गेले. ईडीच्या पथकाने सुमारे 13 तास बंगल्यात छापेमारी केली. यावेळी ईडीने बंगल्यातून रोख रकमेसोबतच एक हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार आणि आणखी एक कार आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

  या दरम्यान सोरेन त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते आणि रात्री उशिरा अज्ञातस्थळी रवाना झाल्याची एकच चर्चा सगळीकडे रंगलेली पाहायला मिळाली. दरम्यान तब्बल 40 तासांनंतर रांची येथे पोहचले आहेत. ईडीने, कमीत कमी तीन मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या तपासात, सोरेनच्या विरोधात सक्तीचे पुरावे गोळा केले आहेत.  बेकायदेशीर खाणकाम आणि राज्यातील कोळसा खाणप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.