
'संजय राऊत यांना का महत्व द्यावं? संजय राऊत म्हणजे, काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे, काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का?', असे ते म्हणाले.
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल येणे अद्याप बाकी आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अध्यक्षांना राजकीय फासावर लटकवा, असं विधान केलं होतं. त्यावर उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी भाष्य केले. ‘संजय राऊत यांना का महत्व द्यावं? संजय राऊत म्हणजे, काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे, काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का?’, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत केलेल्या विधानाचा राहुल नार्वेकर यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘संजय राऊत यांना जर विधिमंडळाचे नियम समजले असते, तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं. अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची जर त्यांना माहिती असती, तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं. आपल्याला सांगितल्याप्रमाणे संजय राऊतांसारख्या व्यक्तीच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय, असं मला वाटतं. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं हा सर्वात उत्तम उपाय आहे. यांचं अस्तित्वात अशा न्यूज कमेंट करून टिकतं, अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावं? आणि त्यांना का महत्व द्यावं?
निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा उद्देश
संजय राऊत हे बिनबुडाचे आरोप करतात. हे आरोप करून ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकावा आणि आपल्याला हवं तसं घडवून घ्यावं, याच हेतूनं केले जातात. संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय, असं मला वाटतं, असेही त्यांनी सांगितले.