संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, राऊत यांच्या कोठडीत १४ दिवसांनी वाढ

राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होत. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली असून,  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे, (sanjay raut judicial custody is increased again) राऊत यांचा कोठडीतील मुक्काम १४ दिवसांनी पुन्हा वाढला आहे. त्यामुळं पुढील सुनावणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे.

    मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra chawl Case) प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडी आज संपत असल्यानं, आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात (Bombay high court) हजर करण्यात आले. राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होत. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली असून,  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे, (sanjay raut judicial custody is increased again) राऊत यांचा कोठडीतील मुक्काम १४ दिवसांनी पुन्हा वाढला आहे. त्यामुळं पुढील सुनावणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे.

    दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी राऊत यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठोठावण्यात आली होती. संजय राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबर म्हणजे आज संपणार होती, तसेच आज सुनावणी पार पडली असता, पुन्हा राऊत यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. जुलै महिन्यात अटक झाल्यानंतर दोन वेळा राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली. तसेच ११ लाख ५० हजार रुपये रोकड राऊतांच्या घरातून जप्त (Seized) करण्यात आली. याबरोबरच व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी (Viral Audio Clip) संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर, गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं.