तुरुंगात जायच्या आधी…आणि तुरुंगातून बाहेर पडल्यावर राऊतांची भाषा बदलली – दिपक केसरकर

राऊतांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. मात्र त्यानंतर लगेच त्यांनी शिंदे गटातील आमदारांना रेड्याचा उल्लेख केला. सरकार म्हणजे औरंगजेबाची औलाद आहे असेही म्हटले. यावर बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, संजय राऊत हे नुकतेच तुरुंगातून बाहेर पडले आहेत.

    मुंबई : ठाकरे गटाचे खासदार व नेते संजय राऊत (Sanjay Raut) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर साफ्ट झालेत का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर लगेचच राऊतांनी फडणवीसांचे कौतुक केले. त्यांनी विकासकामांचे चांगले निर्णय घेतले असं राऊतांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. मात्र त्यानंतर लगेच त्यांनी शिंदे गटातील आमदारांना रेड्याचा उल्लेख केला. सरकार म्हणजे औरंगजेबाची औलाद आहे असेही म्हटले. यावर बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, संजय राऊत हे नुकतेच तुरुंगातून बाहेर पडले आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यावर चांगले बोलत होते. परंतू आता पुन्हा एकदा ते वाईट बोलायला लागलेत याचा विचार करावा लागेल, असं केसरकर म्हणाले.

    दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत दिल्लीत गेले होते. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच सीमाप्रश्नी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितले. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यावर राऊत आदरपूर्वक व चांगले बोलत होते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा विकासाची भाषा बोलत होते. मात्र अचानक काय झाले आणि ते एकदम वाईट बोलायला लागले. त्यांना कुणीतरी काहीतरी शिकवत असावे, असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना राज्यपालांनी जपून बोलले पाहिजे, असं दीपक केसरकर यांनी म्हटले.