कितीही शाखा उघडल्या तरी काही उपयोग होणार नाही – संजय राऊत

ज्यांनी आयुष्यभर हुकुमशाही चालवली ते आता लोकशाही पद्धतीने मतदान करा असं सांगतायत हे हास्यास्पद - शिवसेना शहरप्रमुखाची ठाकरे गटावर टीका

    जे कधी घरातून बाहेर निघाले नाहीत, लोकांपर्यंत पोहोचले नाही, त्यांना आता समजतंय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ज्यांनी आयुष्यभर हुकुमशाही चालवली ते सांगत आहेत लोकशाही पद्धतीने मतदान करा, कितीही शाखा उघडल्या तरी लोकांना माहिती आहे कोण काम करतंय, आता शाखा उघडून काही उपयोग नाही असा टोला शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी संजय राऊत यांच्या दौऱ्यावर लगावला.

    पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली दौरा केला होता. त्या पाठोपाठ आता संजय राऊत उद्या तीन तारखेला शाखांचे उद्घाटन व जाहीर सभेसाठी डोंबिवलीत येणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभेवर ठाकरे गटाने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. मतदार राजा ‘हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये…तुझं एक मत ‘हुकूमशाही’ अशा आशयाचे बॅनर डोंबिवलीत ठाकरे गटाकडून लावण्यात आले होते. संजय राऊत यांच्या दौऱ्यावरून शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाला लक्ष केलं आहे.

    ठाकरे गटाने लावलेल्या बॅनर बाबत मोरे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्यांनी आयुष्यभर हुकुमशाही चालवली, ते आता लोकशाही पद्धतीने मतदान करा असं सांगतात. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, कधी घरातून बाहेर निघाले नाहीत, लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, आता त्यांना समजायला लागला की लोकांपर्यंत पोहोचल पाहिजे, ठाकरे गटाने कितीही शाखा उघडल्या, काहीही केलं तरी कोण काम करतं हे लोकांना माहीत आहे, अशी टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे तळागाळापर्यंत लोकांना भेटतात. त्यांच्या समस्या सोडवत असल्याचे मोरे यांनी सांगितले.

    कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या ०४ फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधले. शिवसेना डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे यासाठी आणि होम हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली शहरातील मानपाडा पथावरील प्राचीन श्री पिंपळेश्वर मंदिरात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, कार्यालय प्रमुख प्रकाश माने उपस्थित होते.