सत्तासंघर्षाच्या निर्णयावर संजय राऊतांनी बोलणं टाळलं, घोटाळ्यातून सुटका व्हावी यासाठी यांनी पक्षांतर केलं – संजय राऊत

सर्व संचालक मंडळ मला दोन दिवसात भेटायला येत आहेत.

    संजय राऊत : आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कोर्टात काय होईल यावर मी आज भाष्य करणार नाही. पण सत्य आणि न्याय याचा विजय होईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत. आमदारांच्या आता अपात्रते संदर्भात मुख्यमंत्री विधिमंडळातील फूट म्हणजे पक्षातील फुट नाही. हे त्यांनी स्पष्ट सांगितले असल्यावर त्या याविषयी – कुठल्या प्रकारचा संभ्रम असल्याचे कारण नाही. विधिमंडळातील किंवा संसदेतील आमदार खासदार पक्ष सोडून गेले ,परंतु पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

    खंडपीठाचे हे निर्देश आहेत. त्यामुळे शिवसेना हा एक संघ आहे आणि हा एकसंघ राहील. आमदार अपात्रतेच्या संदर्भात जो वेळ काढूपणा काढला आहे. ही विधिमंडळाची बेईमानी आहे. घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावर बसलेले अध्यक्ष चालवत आहेत का? किंवा चालू देत येत हा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे संजय राऊतांनी सांगितले.

    संजय राऊतांनी विखे पाटलांवर निशाणा साधला आहे. विखे पाटलांचे अनेक घोटाळे आहेत. त्याबद्दल मी बोललेलो आहे. राहुल कुल यांचा ५०० कोटींचा घोटाळा, विखे पाटील यांचा २०० कोटींचा घोटाळा, सरकार बरोबर असलेल्या अनेक साखर सम्राटांचे हजार कोटींचे घोटाळे जरंडेश्वर वरचा देखील घोटाळा आहेत. हे सर्व संचालक मंडळ मला दोन दिवसात भेटायला येत आहेत. या सगळ्या घोटाळ्यांना पाठबळ मिळावं यातून सुटका व्हावी म्हणून या सगळ्यांनी पक्षांतर केले २०२४ लांब नाही. केंद्रात आणि महाराष्ट्रात नक्की बदल होतील. मग खुलासा काय पाहा तुम्ही काय होत आहे असे संजय राऊत म्हणाले.

    पुढे संजय राऊत म्हणाले, आज सामनामध्ये भूमिका स्पष्ट केली आहे. मोक्षाचा मार्ग कुठून आहे. तो तामिळनाडू मधील भूमी मधूनच आहे. हे आम्ही उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. चाळीस हजार मंदिर जी तामिळनाडूच्या भूमीत आहेत. त्या तामिळनाडूतून कोणी हिंदू धर्मावर काहीही बोलत त्याच्यावर सनातन धर्माची ध्वजा फडकते आहे ना बाबा रामदेव यांना ते समजलं पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.