जी-२० आहे की मोदी २०-२० आहे? संजय राऊतांचा मोदी सरकारला प्रश्न, संजय राऊतांची सडकून टीका

तुम्ही तुमच्या विरोधी पक्ष नेत्याचा द्वेष करत आहात हे चुकीचं आहे संजय राऊत म्हणाले.

    संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टीका : आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, जी-२० आहे की मोदी २०-२० आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या देशात सर्व राष्ट्रांचे प्रमुख आलेले आहेत. परंतु ज्यांनी आपली जमीन घेतली आहे ती परत मिळणार आहे का? भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? किती खर्च झाला आहे? तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा बैठका महत्त्वाच्या असतात, मोदींनी ते केलेल आहे. इंदिरा गांधी, नेहरू असताना देखील अशा प्रकारच्या बैठका झालेल्या आहेत असे ते म्हणाले.

    आज आपल्या भागावर चीनचे अतिक्रमण झालेले आहे परंतु चीनचे राष्ट्राध्यक्ष मिस्टर पुतिन येथे आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. शेवटी काय मिळणार आहे? आम्हाला आमचं लक्ष आहे, लडाख मध्ये गेलेल्या अर्ध्या जमिनी त्या जमिनी परत मिळणार असेल तर आम्ही बैठकीच स्वागत करू. या बैठकीमुळे जर भारताची ताकद वाढलेली असेल तर त्याचं स्वागत नक्की करू. राज्यकर्त्यांची मन मोठी असावी लागतात. तुम्ही तुमच्या विरोधी पक्ष नेत्याचा द्वेष करत आहात हे चुकीचं आहे असे संजय राऊत म्हणाले.

    पुढे संजय राऊत म्हणाले, सुनावणीची तारीख इतके दिवस लांबविण्याची गरजच नाही. कालच मी व्हिडिओ पाहिला विधानसभेचे अध्यक्ष दहीहंडीच्या एका मंचावर कॉलर उडवून नाचत होते. चांगली गोष्ट आहे. तुम्ही सुनावणी द्या न्यायसंगत असल्याची. आम्ही सुद्धा तुमच्या सन्मानासाठी नाचू. हिम्मत असेल तर कायद्याचे पालन करा. किती महिने झाले तुम्ही कायद्याचे पालन करत नाही आहात. तुम्हाला नाचायला वेळ आहे. परंतु आमदारांच्या निर्णयाबाबत तुम्हाला वेळ नाही असे संजय राऊत म्हणाले.

    पुढे संजय राऊत म्हणाले, काल घड्लेली घटना गंभीर अशी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक धनगर समाजाचा कार्यकर्ता गरीब, त्याने जेजुरीचा भंडारा विखे पाटील यांच्या अंगावर टाकला. हा भंडारा आहे, ही काळी शाही आहे का? ही माती आहे का? हा दगड आहे का? हा देवाचा भंडारा आहे. मंत्र्यांच्या समोरच भाजपचे कार्यकर्ता आणि सिक्युरिटी गार्डने त्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध पडला आणि मंत्री फक्त पाहत राहिले, हसत राहिले, हा कुठला कायदा सुरू आहे? पोलीस घेऊन जाऊ शकले असते परंतु हे तुमचे हिंदुत्व आहे. आमच्यावर सुद्धा भंडारा कधी कधी उधळला जातो हा देवाचा प्रसाद आहे. कार्यकर्त्याला लाथांनी मारहाण होते आणि विखे पाटील हसत आहेत. त्याला सोडवत नाही हेच तुमचं हिंदुत्व संजय राऊतांची टीका.