
केलेला खर्च सरकारी तिजोरी वर येणारा भार आहे. त्यांची अक्कल फिरते संभाजीनगरला त्यांना कळलं पाहिजे सरकारी जो खर्च वारेमाफ सुरु आहे.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद : कालपासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आज क्रांती चौका मध्ये शिवसेनेचा अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, चार जवान जे शहिद झाले आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहू. आम्ही निर्गुन आणि अमानुष नाही. देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवांनाना आम्ही विसरु शकत नाही. आम्ही पत्रकार परिषेदेला जाणार की नाही हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना विचारा. मला जर संधी दिली तर मी पत्रकार परिषेदेत प्रश्न विचारेल, मी पत्रकार संपादक आहे. पण तिथे एवढा गोधळ झाला. बॅनरवर हुतात्म्यांचे फोटो नाहीत ठगांचे फोटो मात्र लावलेत असे टीका संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे, सत्ताधाऱ्यांनी केलेला खर्च सरकारी तिजोरी वर येणारा भार आहे – संजय राऊत
पुढे संजय राऊत म्हणाले, टिकेचा टिका घेतल्यावरती सुभेदार सुभेदारीवर चाललेले आहेत, सरकारच्या माध्यमातून पेमेंट झालं आहे , जिल्हाअधिकाऱ्यांचे अकाउंट चेक करा. संभाजी नगर मधील सगळी फायस्टार हॅाटेल ताब्यात घेतली. काल आलेल्या पर्यटकांना जागा मिळू शकली नाही. सगळ्याच्या बुकिंग जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्या असे संजय राऊतांनी सांगितले. काल आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये दौरा केला शेतकऱ्यांचं दु:ख पाहिलं त्यांना अजून भरपाई मिळाली नाही.
पुढे ते म्हणाले, आम्ही सरकारच्या तिजोरीतून खर्च केला नाही. हा आमच्या सर्व पक्षांनी मिळून खर्च केला आमचं अकाउंट चेक करा. त्यांनी केलेला खर्च सरकारी तिजोरी वर येणारा भार आहे. त्यांची अक्कल फिरते संभाजीनगरला त्यांना कळलं पाहिजे सरकारी जो खर्च वारेमाफ सुरु आहे. काल अंबादास दानवेंनी विषय काढला, कोणाला जेवणाचं कॅान्ट्राक्ट दिलं त्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत. नम्रता जापनिस याचा कोट्यावधी रुपयांच्या भाव आहेत. हा सरकारी खर्च आहे, हे काय मुंबईतील एए नावाचे बिल्डर येणार आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांनी सरकारला केला.