महाशक्ती आणि अदृश्य शक्ती मिळून हे राज्य उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला धमकी आली याचे मला काही वाटत नाही. पण, शरद पवार यांना ज्या प्रकारे धमकी आली ज्या प्रकारची भाषा वापरली, या प्रकारची भाषा वापरणारे कोणत्या पक्षाचे लोक आहेत. मला आलेली धमकी, याची मी गंभीरपणे दखल घेणार नाही, ती सरकारने घेणे गरजेचे आहे. ठाण्यातील एका गुंडाने ज्याचा राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी संबंध आहे. 

    मुंबई : पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा हा उद्ध्वस्त करण्याचे काम या राज्यात राजकीय मुखावट्याआड सुरु आहे. कोल्हापूरची दंगल घडली की घडवली यामध्ये आता मी बोलणार नाही. कोल्हापूरसारख्या छत्रपती शाहूंच्या नगरीत जे घडले ते कदापि सहन केले जाणार नाही. ज्या प्रकारचा धार्मिक उन्माद निर्माण झाला, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बदनाम करायचे आणि या राज्याला बदनाम करायचे.

    ठाण्यातील एका गुंडाने दिली धमकी

    ठाण्यातील एका गुंडाने मला धमकी आणि माझ्यावरील हल्ला होणार असल्याची माहिती मी गृहमंत्र्यांना दिली. त्यांनी या माहितीची खिल्ली उडवली, अशा प्रकारे ते राज्य चालवत आहेत. आता वारंवार येणाऱ्या धमकीची गंभीर दखल शासनाने घ्यावी, मी आता याची काळजी करीत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले नाही, आज त्या गुंडाचे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर दिसत आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांबरोबर त्या गुंडाचे फोटो बॅनर्सवर झळकत आहेत, ही या राज्याची कायदा आणि शासनाची सुव्यवस्था आहे. आता या प्रकरणाची तुम्ही चौकशी करणार होते त्याचे काय झाले, असा प्रतिप्रश्नसुद्धा त्यांनी विचारला.

    माझे बंधू आमदार सुनील राऊत आणि मला धमकीचे फोन

    आता पुण्यातून एका व्यक्तीला अटक केली. माझ्यावर हल्ला करण्यावरून त्या व्यक्तीला अटक केलेली आहे. काल माझे बंधू आमदार सुनील राऊत आणि माझ्या फोनवर काही धमकीचे फोन आले, ते तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की हे किती गंभीर आहे. आमच्या सारख्यांना धमकी येणं, आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवणे त्यामुळे हे राज्य बदनाम करण्याचे षडयंत्र या महाशक्ती आणि अदृश्य शक्तीने मिळून हे राज्य उद्ध्वस्त करण्याचे काम चालू आहे.