i-only-listen-to-sharad-pawar-sanjay-raut-after-ajit-pawar-slams-him

महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षांपासून माफिया व गुंडांचे राज्य सुरू आहे. महाराष्ट्रात जे राज्य आणले आहे ते झुंडशाही व गुंडगिरीतून राज्य आणले आहे. असं संजय राऊत म्हाणाले.

  मुंबई : उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यामध्येच (Ulhasnagar Hillline Police Station) भाजपा आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. यामुळे शिंदे गट (Shinde Group) व भाजपमध्ये  (BJP) सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. पोलिस ठाण्यातच हा गोळीबार झाल्यामुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी टिका केली आहे.’उल्हासनगर गोळीबार प्रकरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत’. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

  काय म्हणाले संजय राऊत

  उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय.  महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षांपासून माफिया व गुंडांचे राज्य सुरू आहे. महाराष्ट्रात जे राज्य आणले आहे ते झुंडशाही व गुंडगिरीतून राज्य आणले आहे.
  कालचा प्रकार उल्हासनगरचा नाही तर मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील आहे व या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत.
  एकनाथ शिंदे यांच्या त्रासातून,मनस्तापातून हा गोळीबार केला असल्याचे गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे. मी या गोळीबाराचे समर्थन करणार नाही. गृहमंत्री त्यांचे आहेत.पण त्यांच्या राजवटीत महाराष्ट्रात गुन्हेगारच निर्माण होतील. वर्षभर सांगत आलो आहोत की मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारी टोळ्यांना दुरध्वनी जातात. उद्याच्या निवडणुकांसाठी मदत व्हावी यासाठी गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढले जात आहे. पुण्यात चार गुंड टोळ्यांच्या प्रमुखांना राजकारणासाठी जामिनावर बाहेर काढण्यात आले.
  मुंबईमध्ये तेच सुरू आहे. कायद्याचे राज्य नाही तर फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत. पुण्यात तीन भयंकर गुन्हेगारांना जमीन देण्यासाठी सरकारमधील तीन मंत्र्यांनी कसा प्रयत्न केला याचे पुरावे देईल. असं ते म्हणाले.