‘महाराष्ट्राची माती ही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही,’ संजय राऊत पुन्हा भडकले

मी फक्त सत्य बोललोय. तुमचा आत्मा मेलाय म्हणून तुम्ही जिवंत मुडदे बनलायत असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा बंडखोर आमदारांवर तोफ डागली आहे.

    महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणावर रोज शिवसेना आणि शिंदे गट काही ना काही वक्तव्य करताना दिसत आहे. महाराष्ट्राची माती ही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. याबाबत बोलताना बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल, असं ते म्हणाले. तसेच, फक्त मनसेच (MNS) नाही, तर एमआयएममध्येही (MIM) ते जाऊ शकतात, असा टोलाही राऊतांनी लगावलाय. रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

    “आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल.”, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.