संजय राऊत यांनी आग लावण्याचे काम करु नये, महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आशिष शेलारांचा पलटवार

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आग लावण्याचे काम करत आहेत, त्यांना आग लावण्याचे काम करु नये, अशी घणाघाती टिका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. सध्या महाराष्ट्र कर्नाटक वाद जोरात सुरु असून,  कर्नाटकचे मुख्यमंत्री  बसवराज बोम्मईंना (Basavaraj Bommai) यांनी सांगलीतील काही गावांवर आपला दावा केला आहे,  यावर शिवसेना आक्रमक झाली आहे.

    मुंबई –  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करताना, शिवरायांचा अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून भाजपचे (BJP) हे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला, तर भाजपा बसवराज बोम्मईंना (Basavaraj Bommai) बोलण्यासाठी स्क्रिप्ट देत आहे असं म्हणत भाजपा व कर्नाटकचे मुख्यमंत्री  बसवराज बोम्मईंना (Basavaraj Bommai) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर आता भाजपा देखील आक्रमक झाली असून, भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

    दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आग लावण्याचे काम करत आहेत, त्यांना आग लावण्याचे काम करु नये, अशी घणाघाती टिका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. सध्या महाराष्ट्र कर्नाटक वाद जोरात सुरु असून,  कर्नाटकचे मुख्यमंत्री  बसवराज बोम्मईंना (Basavaraj Bommai) यांनी सांगलीतील काही गावांवर आपला दावा केला आहे,  यावर शिवसेना आक्रमक झाली आहे.

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याला मविआच्या (MVA) नेत्यांकडून देखील समर्थन असल्याचे बोललं जात आहे. तसेच  संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. दरम्यान, शेलार पुढे बोलताना म्हणाले की, विरोधकांना कोणता मुद्दा नसल्याने ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे राजकारण करत आहेत. राऊतांनी आग लावण्याचे काम थांबवावे असं देखील शेला म्हणाले.