मोठी बातमी! संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

सोमवारी कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळं राऊतांची आज ईडी कोठडी संपली होती, व यावर आज सुनावणी पार पडली. यानंतर पुन्हा त्यांना ८ ऑगस्टपर्यंत इडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

    मुंबई : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maître house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर सोमवारी कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळं राऊतांची आज ईडी कोठडी संपली होती, व यावर आज सुनावणी पार पडली. यानंतर पुन्हा त्यांना ८ ऑगस्टपर्यंत इडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ( sanjay raut ED has been remanded in custody till August 8)

    दरम्यान, ईडीच्या तपासात आणखी काही व्यवहार समोर आले आहेत, तुम्हाला जे मांडायचे आहे ते अधीकृत मांडा असं कोर्टानं राऊतांच्या वकीलांना सांगितलं. यावर संजय राऊत अटकेत असले तरी ते धमकावत आहेत, असं स्वप्ना पाटकरांचे वकीलांनी युक्तीवाद केला आहे. त्यामुळं पत्राचाळीत राऊत यांचे आर्थिक व्यवहार असल्याचं ईडीच्या निर्दशनास आल्याने त्यांनी पुन्हा आज संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत इडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

    काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

    मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. पत्राचाळीच्या जमीन व्यवहारात संजय राऊत यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची ९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. याच प्रकरणी संजय राऊतांची १ जुलैला चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळीत राहणा-या नागरिकांची फसवणूकीचा ठपका ठेवण्यात आला आहे.