sanjay raut

मी मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्ष प्रमुख पदही सोडण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितलं. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut Tweet) यांनी सूचक ट्विट केलं आहे.

    मुंबई : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे ३५ ते ४० आमदारांसह काल सूरतमध्ये गेले होते. आता ते गुवाहाटीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. अनेक बैठकाही झाल्या. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य केलं नव्हत. आज संध्याकाळी फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला आणि शिवसैनिकांनी सांगितलं तर मी मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्ष प्रमुख पदही सोडण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितलं.त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut Tweet) यांनी सूचक ट्विट केलं आहे.

    या  ट्विटमध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शेअर करुन त्यासोबत ‘होय संघर्ष करणार!!’, असं ट्विट केलं आहे.  आता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या सगळ्या घटनांनंतर एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

    आज दुपारी एकनाथ शिंदे यांनी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत, अशी प्रतिक्रिया दिली होती. आम्ही सर्व आमदार आता एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. आम्हा सर्वांची तीच भावना आहे. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही पुढची दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी एक बैठक आयोजित केली आहे. ती बैठक झाल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय कळवला जाईल, असं शिंदे यांनी म्हटलं होतं.