Kirit-Somaiya

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अचारसंहितेचं उल्लंघन केला असा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. राऊतांवर कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यासाठी किरीट सोमय्या दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींबाबत सोमय्या तक्रार करणार आहेत. याबाबत त्यांनी टिव्ट (Tweet) करुन माहिती दिली आहे.

    मुंबई : राज्यात सहा जागांसाठी झालेली राज्यसभा निवडणूक (Rajysabha election 2022) अनेक कारणांमुळ चर्चेत राहिली आहे. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे साऱ्यांनी पाहिले. शुक्रवारी पार पडलेल्या या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड व यशोमती ठाकूर (Jitendra Awhad nad Yashomati thakur) यांची मत अवैध ठरविण्यात यावी अशी तक्रार भाजपाकडून निवडणूक आयोगाकडे (Election Commission) करण्यात आली होती.

    त्यानंतर मविआकडून सुद्धा सुधीर मुनगंटीवर व रवी राणा (Sudhir Mungantiwar and ravi rana) यांची मत सुद्धा अवैध ठरविण्यात यावी यासाठी मविआने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पण हि मत वैध असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं. तसेच यावेळी आमदार सुहास कांदेंचं (Suhas kande) मत अवैध ठरविण्यात आलं होतं. त्यानंतर सुहास कांदेंनी या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

    त्यानंतर आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या (Kirit Somayya) अक्शन मूडमध्ये आले असून, राज्यसभा निवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अचारसंहितेचं उल्लंघन केला असा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. राऊतांवर कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यासाठी किरीट सोमय्या दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींबाबत सोमय्या तक्रार करणार आहेत. याबाबत त्यांनी टिव्ट (Tweet) करुन माहिती दिली आहे.