संजय राऊत लवकरच सीमाप्रश्नी पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

सीमाप्रश्न लवकरच सोडविण्यासाठी राज्य सरकारसह शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. दरम्यान, आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी म्हटले की, आपण सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितले आहे.

    मुंबई – काल मुंबईत सीमाप्रश्नी राज्य सरकारची एक उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी तसेच सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) आणि मंत्री शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे स्थापना करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. तेसच मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्याचा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातील बांधवांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न कित्येत वर्षापासून प्रलंबित आहे. देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला तरी, सीमा प्रश्न आ वासून तसाच आहे, त्यामुळं हा प्रश्न लवकरच सोडविण्यासाठी राज्य सरकारसह शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. दरम्यान, आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी म्हटले की, आपण सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितले आहे. बेळगाव, कारवार व निपाणी या भागात मराठी माणसांवर मोठा अन्याय व अत्याचार होत आहे. तिथला मराठी माणूस सुखाने व सुरक्षित राहिला पाहिजे, यासाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.