ठेकेदारी पद्धतीने सैन्य नाही तर गुलाम नेमले जातात; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही. तुघलकानेही असा निर्णय घेतला नसता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. देशाचे रक्षण कुणी करायचे हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हाती सत्ता आहे. ठेकेदारी पद्धतीने सैन्य नाही तर गुलाम नेमले जातात, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते(Sanjay Raut's attack on BJP).

    मुंबई : ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही. तुघलकानेही असा निर्णय घेतला नसता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. देशाचे रक्षण कुणी करायचे हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हाती सत्ता आहे. ठेकेदारी पद्धतीने सैन्य नाही तर गुलाम नेमले जातात, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते(Sanjay Raut’s attack on BJP).

    ५६ वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठिणगी टाकली. त्या ठिणगीचा आज देशभर वणवा झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आज फादर्स डे आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप असल्याचे राऊत म्हणाले. जगात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे त्यांच्या मनातला बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, असं ते म्हणाले.

    संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचा बाणा हा स्वाभिमानाचा, राष्ट्रीय, मराठी, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा आहे. हा बाणा सर्वांच्या छाताडावरती उभा राहिले. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवून लावू. राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शांत आहे. हे राज्य सर्वांना एकत्र करुन चालवाव लागेल, कपट कारस्थान करुन राजकारण होणार नसल्याचे राऊत फडणवीसांना उद्देशून म्हणाले. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं असं नाही. फार घमेंड करु नका, असे ते म्हणाले.

    शिवसेनेचा इतिहास हा अन्यायाविरोधात ठिणगी टाकण्याचा आहे. शिवसेना न्यायाच्या लढ्यात नेहमीच पुढे असते. शिवसेनेचा स्वाभिमानाचा बाणा हा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. जे आज शिवसेनेविरुद्ध बोलत आहेत, ते काही काळाने शिवसेनेच्या पायाशी असतील, असेही राऊत म्हणाले.