संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार, मुंबई सत्र न्यायालयात करणार हजर

संजय राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबर म्हणजे आज संपणार आहे. जुलै महिन्यात अटक झाल्यानंतर दोन वेळा राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली.

    मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra chawl Case) प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यामुळे संजय राऊत यांना दिलासा मिळणार की कोठडीत मुक्काम पुन्हा वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. नुकतचं ईडीनं संजय राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं असून या प्रकरणी आज सुनावणी होऊ शकते.

    यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला (ED) दिले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला निर्देश दिले की १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास मुभा आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणीही १६ तारखेला होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी राऊत यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठोठावण्यात आली आहे.

    संजय राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबर म्हणजे आज संपणार आहे. जुलै महिन्यात अटक झाल्यानंतर दोन वेळा राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार ११ लाख ५० हजार रुपये रोकड राऊतांच्या घरातून जप्त (Seized) करण्यात आली. याबरोबरच व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी (Viral Audio Clip) संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर, गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं. पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा केवळ सहभाग नसून त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे. असं निरिक्षण ईडीनं नोंदवलं आहे. तर, राऊत हे एक राजकिय व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे ते कारागृहा बाहेर येताच ते पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्याता नाकारता येत नाही त्यामुळे, त्यामुळे तापस महत्त्वाच्या टप्यावर असताना त्यांना जामीन देणं योग्य ठरणार नाही. असंही ईडीनं नमूद केलं आहे.