एनडीए हे एक नौटंकी आहे, २०२४ च्या आधी भाजप हा पक्ष देखील फुटलेला असेल – संजय राऊत

इंडिया निर्माण झाल्यानंतर त्यांना एनडीए ची आठवण झाली. शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीएची ताकद शून्य आहे.

    संजय राऊत यांची पत्रकार परिषद : आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, विधानसभा अध्यक्ष पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी अनेक पक्षांतर केलेले आहे. त्यामुळे पक्षाबद्दल जी नीतिमत्ता असते, ती तपासावी लागेल. अनेक पक्षाबद्दल आल्यानंतर अध्यक्ष झाल्यावरती ज्यांनी घटनाबाह्य सरकार बसवलं, यांच्याबद्दल त्यांना किती वेदना आहेत, दुःख आहे, हा तपासाचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेण्यासाठी दबाव आहे, कोणी दुसरा दबाव करत नाही. विधानसभा अध्यक्ष आणि घटनेनुसार शपथ घेतलेली आहे. त्यांनी त्या आधी वकील म्हणून शपथ घेतली आहे. राहुल नार्वेकर यांच्या कार्यकाळात आम्हाला घटनेचा खून होताना दिसत आहे. जनतेच्या मनात रोष आहे, त्या सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागेल.

    उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिलेला आहे. २०२४ पर्यंत सुधीर मुनगंटीवार त्यांचा आणि त्यांच्या पक्षाच अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेलं एनडीए हे एक नौटंकी आहे. इंडिया निर्माण झाल्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीएची ताकद शून्य आहे. २०२४ च्या आधी भाजप पक्ष देखील फुटलेला असेल.

    सनातन धर्माला कोणी तो काढू शकत नाही. सनातन धर्म राहणार आणि त्याच्यासाठी आम्ही काम करत आहे. भारतीय जनता पार्टी आणि सनातन धर्माला वाचवण्याचा ठेका उचललेला नाही. हा इलेक्शनचा मुद्दा नाही का? २०२४ साठी इलेक्शनला मोदी यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही. चीन लडाख यांच्यावरती ते कधीही बोलत नाहीत. इंडिया मध्ये आम्ही मजबुतीने काम करत आहोत.