उद्धव ठाकरेंवरील राज ठाकरे यांच्या टिकेला राऊतांचे प्रत्युत्तर; आम्ही ओरिजनल मिमीक्री पाहू

आमच्या आराध्य दैवताचा अपमान भाजपचे आराध्य दैवत म्हणजे कोश्यारी आणि त्यांचे प्रवक्ते करत आहेत. त्यांना वाटते की आम्ही विसरून जाऊ, मात्र विरोधी पक्ष एकत्र आला आहे. ॲक्शन प्लान तयार आहे. आम्ही वाट पहात आहोत की मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जे स्वाभिमानाच्या गप्पा करतात. ते हात चोळत, तोंड शिवून किती दिवस गप्प बसणार आहेत? असे राऊत म्हणाले.

    मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या विधानावरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे लिखाण झाल्याने पंतप्रधान असताना नेहरूंनीही (Jawaharlal Nehru) माफी मागितली होती. मात्र, भाजपचे (BJP) हे टगे शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत. महाराष्ट्र संतापला असून त्याचा उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

    राऊत पुढे म्हणाले. आमच्या आराध्य दैवताचा अपमान भाजपचे आराध्य दैवत म्हणजे कोश्यारी आणि त्यांचे प्रवक्ते करत आहेत. त्यांना वाटते की आम्ही विसरून जाऊ, मात्र विरोधी पक्ष एकत्र आला आहे. ॲक्शन प्लान तयार आहे. आम्ही वाट पहात आहोत की मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जे स्वाभिमानाच्या गप्पा करतात. ते हात चोळत, तोंड शिवून किती दिवस गप्प बसणार आहेत? आम्ही महाराष्ट्राला दाखवत आहोत की हा त्यांचा स्वाभिमान, अभिमान आहे. याच लोकांनी शिवसेना फोडली.

    राज ठाकरे यांच्या भाषणावर राऊत म्हणाले, की राजनिती म्हणजे मिमीक्री नव्हे. आम्हाला मिमीक्री बघायची असे तर ओरीजनल पाहू.. जॅानी लिव्हरची पाहू.. राजू श्रीवास्तवची पाहू. हे नाटक-मिमीक्री खूप झाल्या. यांच्या पलिकडे आपण मॅच्युअर झाला आहात, महाराष्ट्र पाहा. उद्धव ठाकरेंवर टीका करून किती काळ राजकारण कराल? मी सर्वांना सांगतो. काही विधायक काम करा, असा टोला त्यांनी लगावला.