केंद्रीयमंत्री कराड यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करताच शिरसाटांनी धरलं धारेवर; म्हणाले, ‘दिल्लीत गेल्यानंतर…’

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे.

    संभाजीनगर : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच आता केंद्रातील आणि राज्यातील दोन नेत्यांमध्ये मतभेद समोर आले आहेत. औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपल्यास दिसत आहे.

    भागवत कराड हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी औरंगाबाद लोकसभा लढवण्यासंबंधी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या याच इच्छेला सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांना धारेवर धरले. दिल्लीत गेल्यानंतर भागवत कराड यांच्यावर परिणाम झाला आहे. औरंगाबाद शिवसेनेची जागा आहे. केवळ कराड लढणार म्हणून ती आम्ही सोडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी खडसावून सांगितले.

    लोकसभा लढवण्याची इच्छा दाखवली अन्…

    2024 ला लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. त्यातच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा मंत्री कराड यांनी बोलून दाखवली. त्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाने तीव्र हरकत घेतली. त्यांना एकप्रकारे विरोधच केला आहे.